जळगाव
गुरुवर्य पाटील विद्यालयाची कृषी प्रदर्शनाला भेट
जळगाव -(प्रतिनिधी)-के . सी ई सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर जळगाव च्या इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी एकलव्य क्रीडा संकुल येथे आयोजित ऍग्रो वर्ल्ड कृषी प्रदर्शनाला भेट दिली. कृषी प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या पिकांची माहिती घेतली. शेतीसाठी आवश्यक असलेल्या विविध खते , ठिबक सिंचन, तुषार सिंचन , पाईप्स , मोटारी , शेतीची आधुनिक अवजारे , शेतीसाठी आलेले नवनवीन बी बियाणे , सोलार पंप आणि शेतीतून बनणारे विविध उत्पादने इत्यादींची विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्सुकतेने माहिती जाणून घेतली.
सदर कृषी प्रदर्शनाच्या भेटीतून विद्यार्थ्यांना शेतीविषयक आवश्यक ती सर्व माहिती मिळाली. भेटीचे आयोजन उपशिक्षक योगेश भालेराव, योगेश पाटील तसेच गायत्री पवार यांनी मुख्याध्यापिका धनश्री फालक यांच्या मार्गदर्शनाखाली केले.